सिंधुदुर्गची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

0
11
सिंधुदुर्गची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न
सिंधुदुर्गची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्गची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना

सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय (Sindhudurg Collector Office) येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मान्सूनपूर्व कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नये तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठकीत स्पष्ट केले.

या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (Tripti Dhommise0, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर (Ravindra Khebudkar), जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी (Manish Dalvi ), निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे (Machindra Sukate ) तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा, आरोग्य सेवा, पूरस्थिती नियंत्रण आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here