सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन

0
9

सिंधुदुर्ग  :

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय (Sindhudurg Collector Office ) येथे आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले.
पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या चार्जिंग स्टेशनमुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना अधिक सुलभ आणि आधुनिक सुविधा मिळणार असून हरित ऊर्जेच्या वापरालाही चालना मिळणार आहे.
शासनाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेले हे चार्जिंग स्टेशन भविष्यात वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास तसेच स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here