सिंधुदुर्गात उपद्रवी माकडांवर वनविभागाची धडक मोहीम;  ९९७ माकडे जेरबंद कुडाळ

0
285
धुदुर्गात उपद्रवी माकडांवर वनविभागाची धडक मोहीम; ९९७ माकडे जेरबंद कुडाळ
धुदुर्गात उपद्रवी माकडांवर वनविभागाची धडक मोहीम; ९९७ माकडे जेरबंद कुडाळ

सिंधुदुर्गात उपद्रवी माकडांवर वनविभागाची धडक मोहीम९९७ माकडे जेरबंद

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रामीण व नागरी भागांमध्ये मागील काही महिन्यांपासून उपद्रवी माकडांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला होता. शेतीपिकांचे नुकसानघरांमध्ये शिरकाव तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होत असल्याच्या अनेक बातम्या वनविभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी वनविभागाने नियोजनबद्ध कायदेशीर पद्धतीने विशेष मोहीम राबविली.या मोहिमेअंतर्गत सावंतवाडी वनविभागाने प्रत्येक वनपरिक्षेत्रामध्ये एक RRT Team तयार केलेली आहे. एकूण ९९७ उपद्रवी माकडे जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. सदरचे उपद्रवी माकड हे मनुष्य वस्तीपासुन दुर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहेत.

या मोहिमेमुळे स्थानिक नागरिकशेतकरी व व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला असून शेतीपिकांचे होणारे नुकसान तसेच मानवी वस्तीतील धोका लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार आहेमात्र अद्यापही काही भागांत माकडांचा वावर असल्याने वनविभागाकडून भविष्यातही अशा तक्रारीची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी उपद्रवी वन्यप्राण्यांबाबत कोणतीही अडचण असल्यास त्वरित संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी अथवा सावंतवाडी वनविभागाशी संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे. वन्यजीव व मानव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने उचललेले हे पाऊल महत्वपूर्ण मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here