प्रतिनिधी: दोडामार्ग / सुमित दळवी
दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सार्वजनिक विभागाने रस्ते सुस्थितीत ठेवण्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्यामुळे दोडामार्ग शहरातील गटारे तुंबुन पाणी रस्तावर येत असल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत होत आहे.एकीकडे एम. एन. जी. एल. कंपनांच्या खोदाईमुळे साइंड पटटी कमकुवत होत असताना दुसरीकडे या गटारांमुळे शहरवासीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.त्यामुळे प्राधान्याने शहरातील गटार सफाई होणे गरजेचे आहे. तुंबलेल्या गटारांमुळे शहरात डासांचा फैलाव होवून साथरोगांचा प्रसार झाल्यास शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहे.
आठ दिवसात शहरातील गटार सफाईची कामे सुरू न केल्यास १५ जुलै २०२२ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय येथे सहकाऱ्यांसोबत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर यांनी दिला आहे.


