सिंधुदुर्ग: जिल्हा काँग्रेसतर्फे आठही तालुक्यात गणेश आरास सजावट स्पर्धा

0
56

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत आणि प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांच्या समन्वयातून गणेशचतुर्थी निमित्तान २ ते १२ सप्टेंबर या कालावधीत घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकांनी आपल्या घरातील गणपतीच्या जवळ केलेल्या सजावटीचे, चलचित्राचे एक मिनिटांचा व्हिडीओ बनवून तालुका समन्वयाच्या व्हॉटसअॅपच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या तिस-या दिवसापासून पाच दिवसांच्या गणपतीपासून पुढील कालावधीसाठी असलेल्या गणेशासाठी ते विसर्जनाच्या एक दिवस अगोदर पाठवणे अनिवार्य आहे. त्यानंतर आलेला व्हिडीओ स्पर्धेसाठी विचारात घेतला जाणार नाही. सोबत स्पर्धकांचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवायचा आहे. ही स्पर्धा जिल्ह्यात आठही तालुक्यात घेण्यात येणार असून स्पर्धेचे परीक्षक व्हिडीओ पाहून आवश्यकता वाटल्यास आपल्या घरी येऊन परीक्षण करतील व त्याबाबतचा निकाल जिल्हा काँग्रेस कार्यालयात सादर करतील. या स्पर्धेत क्रमांकाच्याबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम रहाणार आहे.

या स्पर्धेतील प्रत्येक तालुक्यातील विजेत्यास प्रथम पारितोषिक ११,१११/-, द्वितीय पारितोषिक ७,७७७/-, तृतीय पारितोषिक ५,५५५/- उत्तेजनार्थ एकूण दोन क्रमांकास प्रत्येकी १,०००/- पारितोषिक आणि सर्व विजेत्यांना व सहभागींना प्रमाणपत्र अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संफ मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

 या स्पर्धेसाठी तालुकानिहाय समन्वयक विधाता सावंत (वेंगुर्ल), मेघनाद धुरी (मालवण), अभय शिरसाठ (कुडाळ), प्रदीप मांजरेकर (कणकवली), वसंत नाटेकर (वैभववाडी), रविंद्र म्हापसेकर (सावंतवाडी), वासुदेव नाईक (दोडामार्ग), उल्हास मणचेकर (देवगड) हे आहेत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व या स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी जिल्हा स्पर्धा मुख्य समन्वयक अरविंद मोंडकर-९८९२०५५८२० यांच्याशी संफ साधावा. प्रत्येक तालुक्याच्या समन्वयकाकडे नाव नोंदणी करा. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी पत्रकार परिषदेवेळी केले. यावेळी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, माजी नगरसेवक आत्माराम सोकटे, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, समीर नार्वेकर, अंकुश मलबारी, संकेत वेंगुर्लेकर उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here