वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाथा सावंत यांचा सुपुत्र, भटवाडी येथील युवा नेतृत्व प्रितम सावंत यांनी अन्य युवकांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री रविद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम कुडाळ एमआयडीसी येथील विश्रामगृहात पार पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेली ‘शत प्रतिशत भाजपा‘ ही संकल्पना वेंगुर्ला शहरात सत्यात आणण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले. प्रितम सावंत यांच्यासोबत नितीन राणे, बस्त्याव आरावूज, सुधीर पालयेकर, योगेश सावळ, प्रणिल सावळ, मनोहर पाटकर, कपिल सावंत, शुभम सावंत, नवनाथ सावंत, नितीन तेली, आदित्य खानोलकर, राजेश परब, भुषण सावंत, राजाराम सावंत, शानन आरावूज, कैतान आरावूज, अक्षय सावंत, प्रथमेश सावंत, बाळा गावडे, यतिन सावंत, केदार सावंत आदी युवकांनी प्रवेश केला.
यावेळी राजन तेलींसह वेंगुर्ला भाजपाचे प्रसन्ना देसाई, दिलीप गिरप, बाबली वायंगणकर, सुहास गवंडळकर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
फटोओळी – भटवाडी येथील युवकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.


