सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

0
51
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सभा 12 ऑगस्ट रोजी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सभा 12 ऑगस्ट रोजी
सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

 

सिंधुदुर्ग
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी तुषार गवळी तसेच संबंधित शाखेचे संतोष परुळेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांनी जिल्ह्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांचा आढावा घेतला. तसेच पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणांची सद्यस्थिती, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे आणि अत्याचार पीडितांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पोलीस विभागाचे प्रतिनिधी संतोष चिकणे यांनी तपासाधीन प्रलंबित प्रकरणे, मागील बैठकीचे इतिवृत्त तसेच पीडितांना देण्यात आलेले अर्थसहाय्य याबाबत समितीसमोर सविस्तर माहिती सादर केली.
जिल्ह्यातील प्रकरणांचा त्वरित निपटारा करणे, पीडितांना वेळेत न्याय व आर्थिक मदत मिळावी यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here