वेंगुर्ला प्रतिनिधी-
आषाढ अमावास्या ही गटारी नसून दीप अमावास्या आहे. दीप पुजा करुन आपल्या आयुष्यातील, बुद्धीतील अंधःकार दूर करून ज्ञानाचा दिवा, आपले आयुष्य आरोग्य उजळू दे अशी प्रार्थना करुन वेतोरे येथील ज्ञानदा शिशूवाटिकेत दीपपूजा करुन दीप अमावास्या साजरी करण्यात आली.
यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे मुलांनी आणले होते, नंतर मुलांना वाती बनवायला शिकविले, तेल वात व तुपवात घालून ते प्रज्वलित करून त्यांची पुजा करुन नैवेद्य दाखवून प्रार्थना करण्यात आली. नंतर दिव्याच्या अवसेची कहाणी सांगून नैवेद्य वाटला गेला. दिव्यांच्या ठाई सूर्य व अग्नी यांची भावना ठेवून त्यांची पूजा केल्याने आपले अंधारमय जीवन प्रकाशमान व्हावे हा त्यामागचा शुद्ध हेतू असल्याचे ज्ञानदा शिशुवाटिकेच्या संचालिका कांचन दामले यांनी व्यक्त केले. शिशुवाटिकेमुळे अनेक चालीरीती, संस्कृती, परंपरांची माहिती आम्हाला मिळाली अशी प्रतिक्रिया यावेळी पालकांनी दिली.
फोटोओळी – ज्ञानदा शिशूवाटीकेतील मुलांनी दिपपूजन केले.


