सिंधुदुर्ग: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या २० जागांसाठी आरक्षण जाहीर

0
86
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

वेंगुर्ला प्रतिनिधी-

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या एकूण २० जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक ९ अ ही जागा अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी आरक्षित झाली आहे.

नगरपरिषदेच्या सभागृहात नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उपेंद्र तांबोरे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी हे आरक्षण जाहीर केले. यामध्ये प्रभाग क्र. १ अ.-नागरिकांच्या मागासप्रवर्ग

प्रभाग क्र. १ ब-सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र.२ अ-सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्र. २ ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र. ३ अ-नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग(महिला), प्रभाग क्र. ३ ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र.४ अ-नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ४ ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र. ५ अ-नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ५ ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र. ६ अ-सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र.६ ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र. ७ अ-नागरिकांच्या मागास प्रवर्ग, प्रभाग क्र. ७ ब-सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र.८ अ-सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र.८ ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र. ९ अ-अनुसूचित जाती सर्वसाधारण, प्रभाग क्र.९ ब -सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. १० अ-सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. १० ब-सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

आरक्षण सोडतीवेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप तसेच प्रसन्ना कुबल, विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, तुषार सापळे, सचिन वालावलकर, भूषण सारंग, सत्यवान साटेलकर, नितीन कुबल आदी उपस्थित होते.

फोटोओळी – लहान मुलांकडून वेंगुर्ला नगरपरिषदेचे आरक्षण काढण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here