सिंधुदुर्ग : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) परीक्षा रविवार दि.31 जुलै रोजी

0
45

ओरोस: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) परीक्षा रविवार दि.31 जुलै 2022 रोजी जिल्ह्यातील इ.5वी – 44 केंद्र व इ.8वी- 29 केंद्र असून, एकुण 73 केंद्रावर परीक्षा होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यानी दिली आहे.

या परीक्षेसाठी इ.5वीसाठी 3496 विद्यार्थी व इ.8 वीसाठी 1959 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येताना प्रवेशपत्र परीक्षेच्या ठिकाणी अनिवार्य आहे. रविवार दि.31 जुलै 2022 रोजी परीक्षा दोन सत्रात होणार असून सकाळी 11.ते 12.30 पेपर क्रमाक -1 होणार व पेपर क्रमाक -2 दुपारी 1.30 ते 3 यावेळेत होणार आहे. सर्व पालक, विद्यार्थी यांनी नोंद घ्यावी. कोणतीही शंका असल्यास जवळच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय व केंद्रशाळामध्ये संपर्क करावा. विद्यार्थ्यांनी परीक्षेला संबंधित परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी किमान 30 मिनीटे अगोदर उपस्थित राहावे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here