सिंधुदुर्ग: वादग्रस्त ठरलेल्या वाफोली पुलावर पाणी साठल्याने ठेकेदाराच्या बोगस कामाचा झाला पर्दाफाश.

0
39

प्रतिनिधी- संजय भाईप (सावंतवाडी):

सावंतवाडी : वाफोली येथे भरपावसामध्ये काम सुरू असुन सदरचे काम बोगस असल्याचा आरोप शिवसैनिक अशोक परब यांनी केला होता.अखेर आज या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने परब यांचा दावा खरा ठरला.शाळच्या मुलाना सोडणारी स्कुलबस अडकल्याने मुलांचे प्रचंड हाल झाले. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने ठेकेदारानी मे महिन्यापूर्वी कामे पूर्ण करावयाची असताना सदर पूलाचे काम भरपावसामध्ये जूनमध्ये सुरू असल्याने परब यांनी बोगस काम असल्याचा आरोप ठेकेदारावर केला होता.आज मोठ्याप्रमाणात पाणी साटल्याने परब यांच्या आरोपाला दुजोरा मीळाला आहे.याचा मोठा फटका बसणार आहे.वाफोली येथुन गणेश चतुर्थीला गणेश मूर्त्या गोवा तसेच ईतर गावामध्ये नेत असल्याने पाणी आल्यास मोठा फटका बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here