सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा आढावा; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक
मुंबई : नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या नियोजन, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि भाविकांच्या सोयीसुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला राज्याचे मंत्री गिरीष महाजन, शिवेंद्रसिंहराजे भोसले, छगन भुजबळ, दादाजी भुसे, प्रताप सरनाईक यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि आमदार उपस्थित होते.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, भाविकांच्या सुरक्षेची व्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच स्वच्छता व्यवस्थापनाबाबत विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


