सीबीएसई १२ वीच्या एक कोटी उत्तरपत्रिका डिजिटल पद्धतीने तपासणार

0
20
सीबीएसई १२ वीच्या एक कोटी उत्तरपत्रिका डिजिटल पद्धतीने तपासणार
सीबीएसई १२ वीच्या एक कोटी उत्तरपत्रिका डिजिटल पद्धतीने तपासणार

सीबीएसई १२ वीच्या एक कोटी उत्तरपत्रिका डिजिटल पद्धतीने तपासणार

मुंबई l प्रतिनिधी

यावेळी सीबीएसई १२ वीच्या १७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टिमने तपासल्या जातील. याचा अर्थ त्या डिजिटल पद्धतीने तपासल्या जातील. सीबीएसई १२ वीची बोर्ड परीक्षा १७ फेब्रुवारी ते १० एप्रिल दरम्यान होणार आहे.

यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्व उत्तरपत्रिकांचे (आन्सर शीट्स) प्रत्येक पान परीक्षा केंद्रातच स्कॅन करून कॉम्प्युटर सिस्टिममध्ये अपलोड केले जाईल. सुमारे १ कोटी उत्तरपत्रिकांची जवळपास ३२ कोटी पाने स्कॅन करून अपलोड केली जातील. परीक्षक या डिजिटल उत्तरपत्रिका तपासूनच गुण देतील.

१० वी बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्वीप्रमाणे कागदावरच होईल. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांच्या मते या नवीन व्यवस्थेमुळे उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीत लागणारा वेळ आणि खर्च वाचेल. शिक्षक त्यांच्या शाळेत राहूनच मूल्यांकन करू शकतील. मुलांच्या नियमित अभ्यासावर परिणाम होणार नाही. मूल्यांकन अधिक पारदर्शक, जलद आणि चुकाविरहित करण्याच्या उद्देशाने बोर्डाने ही प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुणांची मोजणी आपोआप होणार

– सर्व उत्तरपत्रिका स्कॅन करून डिजिटल पद्धतीनेच तपासल्या जातील

– मूल्यांकन जलद होईल, जेणेकरून वेळेवर निकाल जाहीर करता येतील

– सर्व ३२ हजार शाळांना उत्तरपत्रिका स्कॅनिंगची पूर्ण तयारी ठेवण्याचे निर्देश

– यामुळे एकूण बेरजेतील चुका संपतील, गुणांची मोजणी आपोआप होईल

– १० वीच्या बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिका आधीप्रमाणेच म्हणजे कागदावरच तपासल्या जातील.

– ७ टप्प्यांत होईल ऑनस्क्रीन मार्किंग

डिजिटल तपासणीसाठी शाळेत संगणक प्रयोगशाळा अनिवार्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here