सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह यांची भेट

0
21
सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह यांची भेट
सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह यांची भेट

सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह यांची भेट

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला.

उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर आज सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, प्रफुल पटेल, जय पवार आणि पार्थ पवार हे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 40 मिनिटं चर्चा केली, तर अमित शाह यांच्यासोबत अर्धातास चर्चा केली. सुनेत्रा पवा यांनी संसदेतील पंतप्रधान कार्यालयात मोदींची भेट घेतली आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही कायम एनसीपी सोबत आहोत अशी ग्वाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, यावेळी सुनेत्रा पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जवळपास 40 मिनिट बैठक झाली आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही कायम एनसीपी सोबत आहोत, तसेच उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना भाजप ठामपणे सोबत राहील असा शब्दही यावेळी नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनावर शोक देखील व्यक्त केला आहे.

आपल्या सर्वांचे प्रिय असलेले अजित पवार यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढणं सोपं नाहीये, मात्र लोकांचं कल्याण आणि राज्याचा विकास हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, त्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा संकल्प महत्त्वाचा असेल असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here