सुरतमधील पोद्दार आर्केड पाण्याखाली !

0
32
सुरतमधील पोद्दार आर्केड पाण्याखाली !
सुरतमधील पोद्दार आर्केड पाण्याखाली !

सुरतमधील पोद्दार आर्केड पाण्याखाली !

मुसळधार पावसामुळे मोबाईल व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

सुरत प्रतिनिधी
गुजरातमधील सुरत शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रसिद्ध पोद्दार आर्केड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, संपूर्ण ग्राउंड फ्लोर आणि पहिल्या मजल्याचा काही भाग पाण्याखाली गेला आहे. यामुळे येथील मोबाईल आणि मोबाईल ॲक्सेसरीजच्या शेकडो दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोद्दार आर्केड हे सुरतमधील मोबाईल फोन, ॲक्सेसरीज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या घाऊक व किरकोळ व्यापारासाठी प्रसिद्ध बाजारपेठ मानली जाते. मुसळधार पावसामुळे अचानक पाणी शिरल्याने अनेक दुकानदारांना माल सुरक्षित स्थळी हलविण्याची संधीही मिळाली नाही.
दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अन्य साहित्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. व्यापाऱ्यांकडून नुकसानाचा आढावा घेतला जात असून, पाणी ओसरल्यानंतरच नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, पाणी उपसण्याचे आणि जनजीवन पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here