आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना हेल्पलाईन संपर्क क्रमांकराज्य शासनाकडून जाहीर

0
23

 मुंबई
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य शासनाच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.
नागरिकांच्या मदतीसाठी राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, आपत्कालीन मदतीसाठी खालील क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :
  • १०७० (टोल फ्री)
  • ०१३२२५८७२४३
  • ०२२-२२o२७९९०
  • ०२२-२२७९४२२९
याशिवाय, जिल्हास्तरीय आपत्कालीन संपर्कासाठी १०७७ या क्रमांकावरही नागरिक संपर्क साधू शकतात.
मुसळधार पाऊस, पूरस्थिती, दरड कोसळणे, झाडे पडणे किंवा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास वरील हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करून तात्काळ मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here