सोनं स्वस्त-चांदीचे दरही घसरले

0
25
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी उसळी
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी उसळी

सोनं स्वस्त-चांदीचे दरही घसरले

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. २ फेब्रुवारीच्या सकाळी सोन्याचे दर १ लाख ६० हजारांच्या आसपास स्थिरावले आहेत, तर चांदीच्या दरात अवघ्या दोन-तीन दिवसांत तब्बल १ लाख रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील मंदी, डॉलरचा वाढलेला जोर आणि गुंतवणूकदारांनी केलेली नफा वसुली (Profit Booking) ही यामागची प्रमुख कारणे आहेत. दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६०,७२० रुपये असून २२ कॅरेटसाठी १,४७,३४० रुपये मोजावे लागत आहेत.

भारतीय कुटुंबासाठी सोनं हा फक्त धातू नाही, तर तो एक भरवसा असतो, अडीनडीच्या काळातली गुंतवणूक असते. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या भाववाढीने सर्वसामान्यांच्या या स्वप्नांना अक्षरशः वेढून टाकलं होतं. लग्नाबस्त्याची तयारी करणाऱ्या बापाच्या काळजाचा ठोका चुकला होता, तर गुंतवणूकदारांमध्येही अस्वस्थता होती. आता गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. तर ज्यांना दागिने खरेदी करायचे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

MCX आणि NCDEX हे बाजारही आज सुरू राहणार आहेत. MCX सुरू असेल, तर NCDEX सकाळी १० वाजता उघडेल. त्यामुळे सोन्याच्या किमतीत बजेटमुळे काय बदल होतोय, याकडेही सर्वसामान्यांचे लक्ष असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here