“स्टुडंट डॉक्युमेंट बँक”चा शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई l प्रतिनिधी
दहावी (एसएससी) आणि बारावी (एचएससी) विज्ञान या परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी धड्यांवरील प्रश्नोत्तरे आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरसंच यात ऑनलाइन उपलब्ध होतील. दहावी – गणित, विज्ञान व समाजशास्त्र व बारावी – फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व गणित या विषयांच्या बोर्डाच्या मागील पाच वर्षांतील प्रश्नपत्रिका आणि त्याची आदर्श उत्तरे सांगणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याबरोबरच या सॉफ्टवेअरमधून प्रत्येक धड्यानुसार महत्त्वाच्या संकल्पना समजावून देण्यात येतील.
सध्या हे सॉफ्टवेअर फक्त रजिस्ट्रेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळेल. हे रजिस्ट्रेशन घाटकोपर – महोत्सवामध्ये करता येईल. लवकरच ते विविध शाळांमार्फत सर्व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कामी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, घाटकोपरचा तरूण कार्यकर्ता वेदांत फदाले यांने प्रचंड मेहनत घेतली आहे. आज दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी साहेबांच्या जन्मदिनी ‘स्टुडंट डॉक्युमेंट बँके’चे लोकार्पण झाल्यानंतर लगेच ‘घाटकोपर महोत्सव २०२५’ मध्ये विशेष समारंभाद्वारे विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे सॉफ्टवेअर रजिस्ट्रेशनद्वारे लाभ घेता येणार आहे. सर्व गुणी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.


