राखी जाधव यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्षपदी नियुक्ती

0
39

मुंबई │ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा राखी जाधव यांच्या हाती देण्यात आली असून, त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. जाधव यांच्या नेतृत्वामुळे मुंबईतील पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

राखी जाधव या अनुभवी नगरसेविका असून शहरातील सामाजिक-राजकीय कामांमध्ये त्यांचा प्रभावी हस्तक्षेप राहिला आहे. संघटनामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीनेही ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना जाधव म्हणाल्या की, “मुंबईतील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणे आणि पक्ष संघटन अधिक बळकट करणे हे माझे प्राधान्य असेल. पक्षशक्ती वाढवण्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे.”

मुंबईतील पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात असून पक्षात नवा उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here