बांदा, दि. २० : शासन किंवा ग्रामपंचायतीच्या मदतीची वाट न पाहता सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक नागरिक अण्णा यांनी स्वखर्चाने गटाराची साफसफाई करून परिसरातील नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
बांदा येथील गडगेवाडी परिसरात बाळा आकेरकर यांच्या घराशेजारील गटार तुंबल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे परिसरात पाणी साचून रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन अण्णा यांनी स्वतः पुढाकार घेत मजूरांच्या मदतीने तुंबलेल्या गटाराची साफसफाई केली. तसेच पाण्याचा सुरळीत निचरा व्हावा यासाठी नव्याने गटारही खोदून घेतले.
या कामासाठी लागणारा सर्व खर्च त्यांनी स्वतः केला. दिवसभर मेहनत घेऊन त्यांनी संपूर्ण काम पूर्ण करून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला.
यावेळी बोलताना अण्णा म्हणाले, “गाव स्वच्छ तर आपण स्वच्छ. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोरील परिसराची स्वच्छता राखली तर प्रशासनावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.”
अण्णांच्या या सामाजिक उपक्रमाचे गडगेवाडी परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून स्वच्छतेबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी अशा कृती प्रेरणादायी अस गुरुकिल्ली असल्याचे मतही ग्रामस्थांनी व्यक्त केले.ल्याची भावना व्यक्त होत आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा सक्रिय सहभाग हीच खरी स्वच्छतेची