स्वामी भक्तीतून समाजसेवा : हडपीड देवगड येथे मेडिकल सेंटर उभारण्याचा संकल्प
शिरगाव I पांडुशेठ साटम
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी, मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड देवगड या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनसामान्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. स्वामी भक्तीच्या माध्यमातून समाजकल्याणाचा वटवृक्ष उभा करण्याच्या उद्देशाने ही संस्था गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णांना जटिल व अत्यंत गंभीर आजारांवरील उपचारासाठी मुंबई, गोवा, कोल्हापूर, पुणे यांसारख्या दूरच्या शहरांमध्ये जावे लागत असल्याने त्यांना आर्थिक तसेच वेळेच्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. याचा थेट परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत असल्याने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड यांच्या जागेत एक छोटेखानी मेडिकल सेंटर उभारण्याचा विचार संस्थेने पुढे आणला आहे. या केंद्रात ईसीजी, एमआरआय, सिटी स्कॅन, एक्स-रे यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात उपचार देण्याचा मानस आहे.
या संदर्भात सविस्तर चर्चा व मार्गदर्शनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूकृपा हार्ट सेंटर, अंधेरी पूर्व, मुंबई येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन पी. रत्नपारखी (MD, DM – Cardiology, FESC, FCSI, FSCAI), कन्सल्टंट इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट यांची भेट घेतली. हजारो रुग्णांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून अनेकांना जीवनदान देणाऱ्या डॉ. रत्नपारखी यांना संस्थेच्या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी डॉक्टरांनी या उपक्रमासाठी लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वासन दिले.

या भेटीदरम्यान संस्थेच्या वतीने डॉ. रत्नपारखी यांचा स्वामी शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान त्यांनी अत्यंत आनंदाने स्वीकारला. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव श्री. नंदकुमार तुकाराम पेडणेकर, कोकण कट्टाचे संस्थापक श्री. अजित कुमार पीतळे तसेच श्री स्वामी समर्थ मठ छोटा काश्मीरचे संस्थापक श्री. अशोक गुराम हे उपस्थित होते.
या उपक्रमामुळे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना स्थानिक पातळीवर दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्याची आशा निर्माण झाली असून, स्वामी भक्तीच्या माध्यमातून समाजसेवेचा हा प्रयत्न सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.