“हरित नंदुरबार” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

0
21
"हरित नंदुरबार" उपक्रमांतर्गत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
"हरित नंदुरबार" उपक्रमांतर्गत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

“हरित नंदुरबार” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नंदुरबार : पर्यावरण संवर्धन आणि हरित विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “हरित नंदुरबार” उपक्रमांतर्गत सर्किट हाऊस मुख्य मार्गावर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी प्रशासन विविध स्तरांवर वृक्षारोपण आणि संवर्धन मोहिमा राबवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here