हॉटेल पार्ले इंटरनॅशनलमध्ये भव्य सीफूड फेस्टिव्हल
मालवणी अनलिमिटेड मेजवानी रूफटॉपवर
मुंबईतील पार्ले पूर्व येथील हॉटेल पार्ले इंटरनॅशनलच्या ‘मालवणी मेजवानी’ रूफटॉपवर सीफूडप्रेमींसाठी तीन दिवसांचा खास अनलिमिटेड सीफूड फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. हा खाद्य महोत्सव १९, २० आणि २१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार असून, मालवणी आणि कोकणी चवींचा अस्सल आनंद येथे घेता येणार आहे.
या फेस्टिव्हलमध्ये लाइव्ह बांगडा फ्राय, पोमफ्रेट फ्राय, बॉम्बिल फ्राय, सुरमई तवा फ्राय, कोलंबी मसाला, स्क्विड्स कलवन यांसह चिकन कटलेट, कोथिंबीर वडी, स्टीम राईस, आंबट वरण, आईस्क्रीम, गुलाब जामुन अशा २० पेक्षा अधिक चविष्ट पदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली आहे. महोत्सवाची किंमत सर्व-समावेशक ₹१,२४९ इतकी असून संध्याकाळी ७ ते ९ आणि रात्री ९ ते ११ या दोन सत्रांत हा फेस्टिव्हल खुला राहणार आहे. अधिक माहितीसाठी www.hotelparleinternational.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

