१ जून २०२६ पासून एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृह सेवा मोफत
१ जून २०२६ पासून एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृह सेवा मोफत
Mumbai :
एसटी Maharashtra State Road Transport Corporation कडून प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून दि. १ जून २०२६ पासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृह सेवा मोफत करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे दररोज प्रवास करणारे प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील विविध बसस्थानकांवर स्वच्छतेच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून प्रवाशांनी सुविधांचा योग्य वापर करून स्वच्छता राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.