७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला निकाल

0
39
७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला निकाल
७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला निकाल

७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला निकाल

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

सिंधुदुर्गनगरी I प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी -साठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज झाले असून ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर शांतता व सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी गस्त वाढविणे, प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील मतदारांनी निर्भय वातावरणात आणि उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • क्षेत्रीय दंडाधिकारी – 132
  • केंद्राध्‍यक्ष – 891
  • मतदान अधिकारी -०१- 891
  • मतदान अधिकारी -०२ 891
  • मतदान अधिकारी – ०३ 891
  • शिपाई – ८७२
  • व्‍यवस्थापक – ८७२
  • एकूण – 5,440

याव्‍यतिरीक्‍त ०८ निवडणूक निर्णय अधिकारी, १६ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्‍ती , ०२ निवडणूक निरीक्षक नियुकत.

मतदार यादी

*राज्‍य निवडणूक आयोगाकडील mahasecvoterlist.in अॅपचा वापर करुन मतदार यादीतील नावे शोधता येतील.          * दिनांक ०१/०७/२०२५ रोजीची अधिप्रमाणीत मतदार यादीचा वापरमतदार यादी                                                 * राज्‍य निवडणूक आयोगाकडील mahasecvoterlist.in अॅपचा वापर करुन मतदार यादीतील नावे शोधता येतील.        * दिनांक ०१/०७/२०२५ रोजीची अधिप्रमाणीत मतदार यादीचा वापर करणेत येणार                                                * दुबार मतदारांना मतदानाचा हक्‍क बजावता येणार, मा. राज्‍य निवडणूक आयोगाकडील दिनांक २९/१०/२०२५    चे आदेशान्‍वये कार्यवाही केली जाणार.                                                                                                              * दुबार मतदारांना मतदानाचा हक्‍क बजावता येणार, मा. राज्‍य निवडणूक आयोगाकडील दिनांक २९/१०/२०२५ चे आदेशान्‍वये कार्यवाही केली जाणार.

* मतदान यंत्रे तपशील

आवश्‍यक सीयू – 810 – राखीव -480

आवश्‍यक बीयू – 810 राखीव – 1,162

प्रशिक्षण –

•सर्व केद्राध्‍यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण

(२४/०१/२०२६, ३१/०१/२०२६) तिसरे प्रशिक्षण – ०६/०२/२०२६

* सर्व नोडल अधिकारी, एफएसटी, व्‍हीएसटी पथकातील अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण २०-०१-२०२६ व ३०-०१-२०२६ रोजी पूर्ण.

प्रमुख मुद्दे –

* मतदान होणारी एकूण मतदान केंद्रांची संख्‍या – ८१०

* ६७६ इमारतींमध्‍ये ८१० मतदान केंद्रे,

* एक केंद्र असलेली इमारत संख्‍या- ५५३,

* दोन केंद्र असलेली इमारत संख्‍या -११२,

* तीन केंद्र असलेली इमारत संख्‍या-११

* शॅडो एरिया मतदान केंद्रांची संख्‍या – ७० .

* १,००० पेक्षा जास्‍त मतदार असलेलया मतदान केंद्रांची संख्‍या – ८६

* मतदार यादी चिठठी वाटप पूर्ण – ७८ % (4,42,042)

* एकूण मतदार – स्‍त्री – २,८२,५८८, पुरुष – २,७८,५१६, इतर- ०१ एकूण -५,६१,१०५.

* मतदान केंद्रावर नियुक्‍त अधिकारी/कर्मचारी – ६३12

* क्षेत्रीय अधिकारी नियुक्‍त -१३४

* नियुक्‍त बीएलओ संख्‍या – ८१०

* संवेदनशील केंद्रांची संख्‍या – निरंक

* केंद्रावरील पोलीस नियुक्‍त संख्‍या – ८91

* वैदयकीय सुविधा कक्ष व Creche सुविधा – मतदान केंद्राच्‍या बाजूच्‍या खोलीमध्‍ये करणेत आलेली आहे.

* जलद कृती दल – प्रति तालुका ०२ जलद कृती दले तयार करणेत आलेली आहेत.

* वाहनांची संख्‍या – जीप-१३४, बस-११६ , मिनी बस – ०२.

* मतदान केंद्रनिहाय आरोगय विभागाकडून ८१० केंद्रावर किटचे वाटप होणार

* मतदान प्रतिनीधींची नेमूणका -८१० केंद्रासाठी करणेत येणार

* सखी मतदान केंद्र – ८ तालुक्‍यात 8 ठिकाणी स्‍थापन

* आदर्श मतदान केंद्र – ८ तालुक्‍यात 8 ठिकाणी स्‍थापन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here