सिंधुदुर्ग: वेंगुर्ला-भुजनाकवाडी येथील विश्राम किनळेकर यांचे वार्धक्याने मुंबई येथे निधन

0
31
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

वेंगुर्ला प्रतिनिधी-

वेंगुर्ला-भुजनाकवाडी येथील मूळ रहिवासी व सध्या मुंबईस्थित असलेले विश्राम उर्फ तात्या काशिनाथ किनळेकर (८१) यांचे २७ जुलै रोजी वार्धक्याने मुंबई येथे निधन झाले. भुजनाकवाडी विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये मुंबईत राहूनही त्यांनी फार प्रयत्न केले होते. त्यांचे शालेय शिक्षण आर.के. पाटकर हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सूना, जावई, भाऊ, पुतणे व नातवंडे असा परिवार आहे. आसोली हायस्कूलचे रमण किनळेकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. 

फोटो – विश्राम किनळेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here