सिंधुदुर्ग : घरोघरी गौरीचे उत्साहात पूजन

0
33
सिंधुदुर्ग

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहरासह तालुक्यात काही घरोघरी प्रत्येकाच्या परंपरेनुसार आज रविवारी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गौरी पूजन करण्यात आले.

गणेश चतुर्थीप्रमाणे गौरी पूजनालाही तेवढेच महत्त्व आहे. प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे या देवींचा कार्यक्रम तीन, दोन आणि एक दिवस चालतो. त्यानुसार प्रत्येकाच्या परंपरेनुसार शनिवारी आणि आज रविवारी पाणवठ्यावरुन देवींचे आगमन झाले. त्यानंतर त्यांचे विधीवत पूजन करण्यात आले. देवीसमोर वोवसा भरण्याचा कार्यक्रम महिलांनी उत्साहात पार पाडला. रात्रौ या देवींसमोर फुगड्या, भजन असे कार्यक्रमही संपन्न झाले.

फोटाओळी – शहरातील शिवसेनेचे शहरप्रमुख अजित राऊळ यांच्या घरी देवीचे पूजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here