वेंगुर्ला प्रतिनिधी- मठ येथील वैभव आईर या पंधरा वर्षीय मुलाच्या हातामध्ये रपाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना अॅटमबॉम्ब फुटून अपघात झाला. यामध्ये त्याच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. ओरोस येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर अधिक उपचार करण्यात आले.
वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरू असताना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. यातच वैभव उत्साहामध्ये फटाके फोडत असताना अचानक अॅटमबॉम्ब लावताना एक अॅटमबॉम्ब लावता लावता त्याच्या हातात फुटला. तत्काळ त्याला वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्या हाताला जास्त मार लागल्याने प्राथमिक उपचार करून वैभव याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
फोटोओळी – वैभवच्या हातात अॅटमबॉम्ब फुटून जखमी झाला.


