चिपळूणमध्ये प्लास्टिकविरोधी मोहिमेला वेग;दुकानदाराला २ हजार  रु  दंड

0
105
चिपळूणमध्ये प्लास्टिकविरोधी मोहिमेला वेग;दुकानदाराला २ हजार  रु  दंड
चिपळूणमध्ये प्लास्टिकविरोधी मोहिमेला वेग;दुकानदाराला २ हजार  रु  दंड

चिपळूणमध्ये प्लास्टिकविरोधी मोहिमेला वेग; दुकानदाराला २ हजार  रु  दंड

भेंडीनाक्यात अल्पवयीनाकडून सुमारे १ किलो प्लास्टिक जप्त  

चिपळूण :

शहरातील भेंडीनाका परिसरात मंगळवारी सकाळी प्लास्टिक पिशव्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या अल्पवयीन युवकाला नगरपरिषदेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याची चौकशी केल्यानंतर पिशव्यांचा पुरवठा करणाऱ्या सुर्वे नावाच्या दुकानदारावर २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच अल्पवयीनाकडून सुमारे १ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी नगरपरिषद सातत्याने कारवाई करत आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते आणि कर्मचारी शहरात नियमित पाहणी करत आहेत. त्यादरम्यान जाधव भेंडीनाक्यात गस्त घालत असताना सायकलवरून भाजी विक्रेत्या महिलांना प्लास्टिक पिशव्या विकत असलेला अल्पवयीन आढळून आला. चौकशीत त्याने पिशव्या सुर्वे नामक दुकानदाराकडून आणल्याचे सांगितले, त्यानंतर दुकानदारावर तातडीने कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here