नवी मुंबईत ‘मालवणी फूड फेस्टिव्हल’चे आयोजन; खऱ्या कोकणी चवींचा मेळा

0
173

नवी मुंबई

कोर्टयार्ड बाय मॅरियट, नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमच्या बाजूला असलेल्या मलंग रेस्टॉरंटमध्ये १२ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत “मालवणी फूड फेस्टिव्हल”चे आयोजन करण्यात आले आहे. या दहा दिवसीय अन्नमहोत्सवाच्या निमित्ताने कोंकणातील अस्सल व प्रसिद्ध मालवणी पदार्थांचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी खाद्यप्रेमींना मिळणार आहे.

या फेस्टिव्हलमध्ये विशेषतः मालवण परिसरातील पारंपरिक सी-फूड आणि विविध प्रकारच्या माशांपासून तयार केलेले रुचकर पदार्थ पाहुण्यांसाठी सादर केले जाणार आहेत. बॉम्बील फ्राय, कोळंबी मसाला, मोरी मसाला, तिसऱ्या कालवण, पापलेट घावणे यांसारख्या खऱ्या मालवणी चवींचा अनुभव येथे घेता येणार आहे. कोंकणातील मसाल्यांचा सुगंध आणि पारंपरिक पाककृती यामुळे हा फूड फेस्टिव्हल खाद्यरसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here