कोपरखैरणेत अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
मंत्री गणेश नाईक यांची उपस्थिती
कोपरखैरणे l
श्री विठ्ठल रखुमाई चॅरिटेबल ट्रस्ट, संत तुकाराम महाराज हरिनाम सप्ताह आणि कै. अण्णासाहेब पाटील रहिवासी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरखैरणे येथे विठ्ठल रखुमाई वर्धापन दिन सोहळा तसेच संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व अध्यात्मिक ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या धार्मिक व अध्यात्मिक सोहळ्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थिती लावून सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांतून समाजात सद्भावना, समता आणि अध्यात्मिक जागृती निर्माण व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त केली.
हरिनाम सप्ताहादरम्यान भाविकांची मोठी उपस्थिती लाभली असून, कीर्तन, भजन आणि ज्ञानेश्वरी पारायणामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.


