रायगड जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

0
150
‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुलींच्या हॉकीसाठी ७ ऑगस्टला बालेवाडीत निवड चाचणी; रत्नागिरीतील खेळाडूंना सहभागाचे आवाहन
‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुलींच्या हॉकीसाठी ७ ऑगस्टला बालेवाडीत निवड चाचणी; रत्नागिरीतील खेळाडूंना सहभागाचे आवाहन

रायगड जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

२६ जानेवारी २०२६ रोजी होणार गौरव

उत्कृष्ट क्रीडापटू, दिव्यांग खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी रायगड जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने रायगड जिल्हा क्रीडा पुरस्कार (सन २०२३-२४ व २०२४-२५) प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी पात्र क्रीडापटू व क्रीडा मार्गदर्शकांकडून अर्ज मागविण्यात येत असून इच्छुकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पुरस्कारांचे वितरण २६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख १०,००० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे राहणार आहे. उत्कृष्ट महिला व पुरुष क्रीडापटू, दिव्यांग खेळाडू तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंत क्रीडा मार्गदर्शकांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२५ असून, त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड (अलिबाग) येथे सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज विहित नमुन्यात भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. उशिरा किंवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा क्रीडा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पुरस्कारासंदर्भातील अधिक माहिती, अर्जाचा नमुना व पात्रतेच्या अटी जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड (अलिबाग) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here