गुटखा उत्पादकांवर मकोका; नवीन वर्षापासून कठोर कारवाई
मुंबई l
राज्यात गुटखाबंदी असूनही शाळा, महाविद्यालय परिसरात गुटखा आढळत असल्याने बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.
अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही माहिती देत सांगितले की, कायद्यातील दुरुस्ती नंतर येत्या नवीन वर्षापासून गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात येईल. यापूर्वी “हार्म आणि हर्ट” या घटकांअभावी मकोका लागू करता येत नव्हता. मात्र कायद्यात बदल करून ही अडचण दूर केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, गुटखा उत्पादन, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करता यावी यासाठी हा कायदा अधिक कडक करण्यात येणार असून, या


