सुशांत नाईक यांनी मानले कणकवलीकरांचे आभार

0
339
सुशांत नाईक यांनी मानले कणकवलीकरांचे आभार
सुशांत नाईक यांनी मानले कणकवलीकरांचे आभार

सुशांत नाईक यांनी मानले कणकवलीकरांचे आभार

कणकवली –
कणकवलीत जो बदल जनतेला अपेक्षित होता, तो बदल अखेर प्रत्यक्षात उतरला. भ्रष्टाचाराविरोधात आणि वर्षानुवर्षे सत्तेभोवती फिरणाऱ्या भ्रष्ट टोळीच्या विरोधात जनतेने स्पष्ट आणि ठाम भूमिका घेत कणकवली शहर विकास आघाडीला भरभरून पाठिंबा दिला. हा विजय कुठल्याही दबावाचा, पैशाच्या जोरावर उभ्या केलेल्या यंत्रणेचा नसून तो केवळ आणि केवळ जनतेच्या सुज्ञ निर्णयाचा असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान काही घटकांकडून पैशाच्या जोरावर ही जागा जिंकली आहे असा गैरप्रचार केला जात होता. मात्र कणकवलीकरांनी अशा पैशाच्या राजकारणाला साफ नकार देत, विवेक, प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारालाच स्वीकारले. मतपेटीतून जनतेने ठणकावून सांगितले की कणकवली विकाऊ नाही आणि इथे पैशापेक्षा माणुसकी, विश्वास आणि परिवर्तन महत्त्वाचे आहे.
या निकालामुळे कणकवली शहर विकास आघाडीला मिळालेली साथ ही केवळ निवडणुकीपुरती नसून ती भ्रष्टाचारविरोधी लढ्याला मिळालेली नैतिक ताकद आहे. कणकवली शहरातील नागरिक, कनकनगरवासी, तसेच संपूर्ण शहरातील विविध वसाहतींमधील मतदारांनी एकजुटीने या परिवर्तनाला पाठिंबा दिला. प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करत भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवलीचा संदेश दिला आहे. या ऐतिहासिक कौलाबद्दल कणकवलीकरांचे, कनकनगरवासीयांचे आणि शहरातील सर्व घटकांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात येत असून, जनतेने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी शहर विकास आघाडी कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here