ज्ञानयात्री उपक्रमांतर्गत काकडपाणी शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेस भेट
नाशिक : जिल्हा परिषद नाशिकच्या ज्ञानयात्री शैक्षणिक सहल उपक्रमांतर्गत आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काकडपाणी येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद नाशिक येथे भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच काकडपाणी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


