नाताळ–नववर्ष पर्यटन हंगामात गणपतीपुळेला पर्यटकांची विक्रमी गर्दी

0
290
नाताळ–नववर्ष पर्यटन हंगामात गणपतीपुळेला पर्यटकांची विक्रमी गर्दी
नाताळ–नववर्ष पर्यटन हंगामात गणपतीपुळेला पर्यटकांची विक्रमी गर्दी

नाताळ–नववर्ष पर्यटन हंगामात गणपतीपुळेला पर्यटकांची विक्रमी गर्दी

गणपतीपुळे | प्रतिनिधी

जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या गणपतीपुळे येथे नाताळ सण, सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पर्यटनाचा कळस गाठत असून, आगामी २०२६ नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पर्यटकांकडून गणपतीपुळे येथील श्री गणपतीचे दर्शन घेण्याबरोबरच समुद्रकिनारा, निसर्गरम्य परिसर आणि पर्यटनस्थळांचा मनमुराद आनंद घेतला जात आहे. गणपतीपुळे व परिसरातील स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवळीने नटलेला निसर्ग आणि शांत वातावरण यामुळे पर्यटकांचा विशेष ओढा दिसून येतो.

याच पर्यटन हंगामात गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस उत्पादन व विक्री प्रदर्शनाला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात कोकणातील पारंपरिक व स्थानिक उत्पादने, हस्तकला, तसेच विविध रुचकर कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे. त्यामुळे पर्यटनासोबतच स्थानिक उत्पादनांना चालना मिळत आहे.

नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथे आलेली ही पर्यटकांची गर्दी स्थानिक लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी सुगीचे दिवस घेऊन आली असून, हॉटेल व्यवसाय, पर्यटन सेवा, विक्रेते आणि स्थानिक उद्योजकांना आर्थिक बळकटी मिळत आहे.

एकूणच नाताळ–नववर्ष पर्यटन हंगामात गणपतीपुळे हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र ठरत असून, कोकणातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळत असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here