ठाणे शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीला धक्का
मीनाक्षी शिंदे यांचा जिल्हा महिला आघाडी संघटक पदाचा राजीनामा
ठाणे l
शिवसेना (शिंदे गट) ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या संघटक मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मीनाक्षी शिंदे यांनी वैयक्तिक कारणास्तव आपण पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले असून, पक्ष नेतृत्वाकडे अधिकृतरित्या राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या कार्यकाळात महिला आघाडीच्या संघटनात्मक कामकाजात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
या राजीनाम्यानंतर शिवसेना (शिंदे गट) ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या आगामी वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पुढील नियुक्तीबाबत पक्षाकडून लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


