वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
मांजरी बुद्रुक, पुणे l प्रतिनिधी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मांजरी बुद्रुक, पुणे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडली.

या सभेदरम्यान चालू गळीत हंगामाची स्थिती तसेच साखर उद्योगासमोरील सद्यपरिस्थिती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. साखर उद्योगातील उत्पादन, अडचणी, भविष्यातील आव्हाने आणि संधी यावर सदस्यांमध्ये सखोल चर्चा झाली.
तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने साखर उद्योगात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना आणि नवकल्पनांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. संशोधन, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, कार्यक्षम उत्पादन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय याबाबतही सभेत विचारमंथन झाले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या पुढील कार्यदिशेवर मार्गदर्शन करताना साखर उद्योग अधिक सक्षम, शाश्वत आणि स्पर्धात्मक बनविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.


