रत्नागिरी : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गोरगरिबांना मोफत उपचाराचा लाभ

0
122
रत्नागिरी : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गोरगरिबांना मोफत उपचाराचा लाभ
रत्नागिरी : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गोरगरिबांना मोफत उपचाराचा लाभ

रत्नागिरी : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गोरगरिबांना मोफत उपचाराचा लाभ

रत्नागिरी – महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील गरजू आणि गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी आधार व संजीवनी मिळत आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 22,575 रुग्ण नोंदवले गेले असून, त्यापैकी 10,836 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. दिवसेंदिवस या योजनेतून उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

पूर्वी खासगी रुग्णालयांमध्ये महागड्या उपचारांसाठी रुग्णांना लाखोंचा खर्च करावा लागत होता, जे गरीब रुग्णांसाठी परवडत नव्हते. किडनी प्रत्यारोपण, बायपास सर्जरीसह इतर अनेक महागडे उपचारांसाठी रुग्णांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागायचा. त्यामुळे राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत महागड्या आजारांचा समावेश केला आहे.

राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत नागरिकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. या योजनेमुळे रुग्णांना विविध महागड्या उपचारांसाठी कोल्हापूर, मुंबई किंवा पुणे सारख्या शहरांमध्ये जाऊन उपचार करावं लागत नव्हतं.

आता या योजनेत महागड्या शस्त्रक्रिया समाविष्ट झाल्यामुळे रत्नागिरीतील गोरगरीब रुग्णांना मोफत उपचाराचा फायदा मिळतो आहे. आतापर्यंत 10 हजारहून अधिक रुग्णांनी योजनेचा लाभ घेऊन उपचार सुरू केले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी ऑनलाईन रेशन कार्ड, आधार कार्ड, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, कायमचं रहिवासी दाखला आणि फोटो यांसारखी आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे.

या योजनेमुळे रत्नागिरीतील गरीब रुग्णांना महागड्या उपचारांमध्ये आर्थिक अडथळा न भासता आरोग्य सेवांचा लाभ घेता येत आहे, आणि त्यांच्या जीवनात ही योजना मोठा आधार ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here