भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा दणका !

0
101
भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा दणका !
भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा दणका !

भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा दणका !

पालिकेतील 28 अधिकाऱ्यांचे स्वेच्छानिवृत्ती प्रस्ताव

मुंबई l

सनय छत्रपती शासन पक्षाच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला गती मिळत असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. महापालिकेतील आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या चौकशी प्रकरणानंतर आता महापालिकेतील 28 अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी प्रस्ताव सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, 41 बोगस व भ्रष्ट अधिकाऱ्यांची निवडणुकीदरम्यान पोलखोल होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. “कर है तो डर है” या भूमिकेवर पक्ष ठाम असून, भ्रष्टाचाराविरोधात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, सुमारे 22,000 कोटी रुपयांच्या कथित फालतू व अनावश्यक कामांसाठी घेतलेल्या कर्जाची चौकशी होणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त किंवा अन्य वरिष्ठ अधिकारी बदलीवर गेले किंवा निवृत्त झाले तरी महानगरपालिका कर्जमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि घराणेशाहीमुक्त करण्याचा निर्धार कायम राहील, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

या घडामोडींमुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, पुढील काळात चौकशी व कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here