मुंबई शहर जिल्हा युवा पुरस्कारासाठी १२ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
80
मुंबई शहर जिल्हा युवा पुरस्कारासाठी १२ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई शहर जिल्हा युवा पुरस्कारासाठी १२ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई शहर जिल्हा युवा पुरस्कारासाठी १२ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई l प्रतिनिधी

 मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र युवक, युवती तसेच संस्थांनी जिल्हा युवा पुरस्कारासाठी १२ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी केले आहे. हा पुरस्कार २०१९–२० ते २०२४–२५ या कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांसाठी प्रदान करण्यात येणार आहे.

जिल्हा युवा पुरस्कारासाठीचे अर्ज भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, दुसरा मजला, जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर कार्यालय, धारावी येथे सादर करावयाचे आहेत.

राज्याच्या युवा धोरण २०१२ नुसार युवकांना मानव संसाधन विकासाचा प्रमुख आधारस्तंभ मानले जाते. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत युवक–युवतींनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे समाजात युवाशक्तीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देऊन कार्यकर्त्या युवक–युवती आणि संस्थांचा सन्मान केला जातो.

समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी भाग तसेच शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, संस्कृती, कला, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध, व्यसनमुक्ती आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या युवक, युवती व संस्थांना जिल्हास्तरावर या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी ८८९८०९०९०७ / ९५९४३६९५६१ / ९४२२०३०३८३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here