मुंबई महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत; ठाकरे गट–मनसेची गणिते बिघडली

0
116

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालात काही वेळातच मोठा बदल पाहायला मिळाला असून, आता शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी बहुमतासाठी ११४ जागांची आवश्यकता असते. सध्या फक्त एका जागेचा निकाल बाकी असून महायुतीला एकूण ११६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीची सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांचे राजकीय टेन्शन कमी झाले आहे.

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीला मुंबईत एकूण ७३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे ही युती बहुमताच्या आकड्यापासून बरीच दूर राहिली आहे. काँग्रेसने पाठिंबा दिला तरी बहुमताचा आकडा गाठणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेत दहा ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला असून त्यांनीही या निवडणुकीत आपली उपस्थिती ठळकपणे दाखवून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here