जनतेचा स्पष्ट कौल भाजपकडे ; मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड, पुण्यात ऐतिहासिक विजय

0
81
जनतेचा स्पष्ट कौल भाजपकडे
जनतेचा स्पष्ट कौल भाजपकडे

जनतेचा स्पष्ट कौल भाजपकडे ; मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड, पुण्यात ऐतिहासिक विजय

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने (भाजप) अभूतपूर्व कामगिरी करत २,८६९ पैकी तब्बल १,४२२ जागांवर विजय मिळवला असून, भाजप राज्यातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ३६६ जागा जिंकल्या असून, काँग्रेसला ३३१ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत भाजपने २९ पैकी १६ महापालिकांमध्ये स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

भाजपने काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत रणनीतीपूर्ण निर्णय घेतल्याचा फायदा पक्षाला झाला आहे. त्यामुळे अनेक प्रमुख महानगरपालिकांसह राज्यातील १६ महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत आहे, तर उर्वरित ठिकाणी मित्रपक्षांच्या सहकार्याने सत्तास्थापना शक्य होणार आहे. या निकालांमुळे विरोधी पक्षांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांतही भाजपने आपली विजयाची घोडदौड कायम राखली आहे. नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसह एकूण १६ महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी मुंबई महापालिकेत भाजप सर्वाधिक जागा जिंकत सर्वांत मोठा पक्ष ठरला असून, शिवसेना शिंदे गटाच्या साथीने महायुतीला निसटते बहुमत मिळाले आहे. मुंबईत शिंदे गटाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली हे त्यांचे बालेकिल्ले त्यांनी कायम राखले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here