महाटीईटी २०२५ चा अंतरिम निकाल जाहीर; २१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन आक्षेप नोंदविण्याची संधी

0
61
MAHA-TET परीक्षा २८ जून २०२६ रोजी; रायगडमध्ये १०,२०३ उमेदवार परीक्षेला बसणार
MAHA-TET परीक्षा २८ जून २०२६ रोजी; रायगडमध्ये १०,२०३ उमेदवार परीक्षेला बसणार

महाटीईटी २०२५ चा अंतरिम निकाल जाहीर; २१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन आक्षेप नोंदविण्याची संधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निकालासंदर्भात गुण पडताळणी करावयाची असल्यास किंवा कोणतीही त्रुटी अथवा आक्षेप असल्यास उमेदवारांना २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येणार आहे.

यासाठी उमेदवारांनी http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करूनच आक्षेप सादर करावेत, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे. अन्य कोणत्याही मार्गाने प्राप्त होणाऱ्या अर्जांचा किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधित सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here