नवीन आयकर कायदा १ एप्रिलपासून लागू
केंद्र सरकारकडून लागू करण्यात येणारा नवीन आयकर कायदा येत्या १ एप्रिलपासून अंमलात येणार असून, या कायद्यात करदात्यांसाठी दिलासादायक असे अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. शिक्षण, आरोग्य, आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याच्या मुदती, एनआरआयंसाठी टीडीएस नियम तसेच विमा आणि सुधारित रिटर्नशी संबंधित तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
नवीन कायद्यानुसार शिक्षण व आरोग्य सेवांसाठी आकारला जाणारा टीसीएस दर ५ टक्क्यांवरून थेट २ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच आरोग्य उपचारासाठी परदेशात जाणाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
आयटीआर दाखल करण्याच्या अंतिम मुदतींमध्येही स्पष्टता देण्यात आली आहे. आयटीआर-१ आणि आयटीआर-२ दाखल करणाऱ्या करदात्यांना ३१ जुलैपर्यंत विवरणपत्र सादर करता येणार आहे. तर ऑडिट न लागणाऱ्या व्यवसाय प्रकरणांसाठी तसेच ट्रस्टसाठी रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. एनआरआय (अनिवासी भारतीय) करदात्यांसाठीही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मालमत्ता विक्रीच्या व्यवहारात टीडीएस संदर्भातील
पान ४ वर


