महिलांसाठी ‘ शी-मार्ट’, एआय प्रशिक्षणाची घोषणा

0
51
महिलांसाठी ' शी-मार्ट', एआय प्रशिक्षणाची घोषणा
महिलांसाठी ' शी-मार्ट', एआय प्रशिक्षणाची घोषणा

महिलांसाठी ‘ शी-मार्ट’, एआय प्रशिक्षणाची घोषणा

नवी दिल्ली l

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. एआय, डिजिटल स्किल्स आणि ग्रीन जॉब्ससाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आल्याने महिलांसाठी नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या क्षेत्रातील प्रशिक्षण आणि कौशल्य विकासामुळे भविष्यातील नोकऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.

शहरी आणि निमशहरी भागात काम करणाऱ्या महिलांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षा, रात्रीच्या वेळची वाहतूक व्यवस्था आणि पाळणाघरांची सोय यावर अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे महिलांच्या दैनंदिन अडचणी दूर होऊन सुरक्षिततेची भावना बळकट होईल आणि रोजगारातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.मत्स्योत्पादन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ५०० जलसंधारण प्रकल्प आणि ‘अमृत सरोवर’ विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सागरी किनारपट्टी भागात महिलांच्या नेतृत्वाखालील गटांना एकत्र करून त्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्यात येणार असून, त्यामुळे महिला गटांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे.‘शी-मार्ट’ मधून महिलांनां उत्पादनांची थेट विक्री तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे खुले होणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here