मुंबईत ‘पल्स’ जागतिक वैद्यकीय परिषद

0
32
मुंबईत ‘पल्स’ जागतिक वैद्यकीय परिषद; महाराष्ट्राला वैद्यकीय पर्यटनाचा नवा ब्रँड देण्याचा प्रयत्न
मुंबईत ‘पल्स’ जागतिक वैद्यकीय परिषद; महाराष्ट्राला वैद्यकीय पर्यटनाचा नवा ब्रँड देण्याचा प्रयत्न

मुंबईत ‘पल्स’ जागतिक वैद्यकीय परिषद

महाराष्ट्राला वैद्यकीय पर्यटनाचा नवा ब्रँड देण्याचा प्रयत्न

वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राची ओळख अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने ‘पल्स’ या भव्य वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देश-विदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील २,९०० हून अधिक तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक आणि मान्यवर सहभागी होणार असून, वैद्यकीय ज्ञान, नवसंशोधन आणि भविष्यातील उपचार पद्धतींवर व्यापक चर्चा होणार आहे.

‘पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वेलनेस उपचारांचा वैद्यकीय पर्यटनातील ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून परिषद अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. पारंपरिक आणि खर्चिक उपचारांऐवजी नागरिकांचा कल ‘वेलनेस’ उपचारांकडे वाढत असल्याने, आयुषमधील विविध उपचार पद्धती वेलनेस संकल्पनेशी जोडण्यावर भर देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

पान ४ वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here