जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची मतदान केंद्रांवर पाहणी

0
35
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची मतदान केंद्रांवर पाहणी
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची मतदान केंद्रांवर पाहणी

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची मतदान केंद्रांवर पाहणी

रत्नागिरी l प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपला लोकशाही हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज मनुज जिंदल यांनी नाचणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाचणे क्र. १ येथील मतदान केंद्रास भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई, गटविकास अधिकारी चेतन शेळके, ग्रामविकास अधिकारी गणपत खरंबेळे, मंडळ अधिकारी प्रतापसिंह पोळ व ग्राम महसूल अधिकारी सुरेश जाधव उपस्थित होते. सुरक्षा व्यवस्था, मतदान पथके, मतदारांची संख्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मतदार सहाय केंद्र व मंडप व्यवस्था याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महिला व दिव्यांग मतदारांसाठी सुरक्षित व सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला असून, मतदानासाठी येताना मतदारांनी वैध ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या मतदान केंद्रावरील एकूण व्यवस्था समाधानकारक असल्याचे नमूद करत जिल्हाधिकाऱ्यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून, जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here