भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह 2026

0
29
एआयच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाची चिंता
एआयच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाची चिंता

भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह 2026

एआय-सक्षम शिक्षणासाठी राष्ट्रीय व्यासपीठ

दिल्ली l प्रतिनिधी

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह 2026 हे एआय-सक्षम शिक्षणात धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे राष्ट्रीय व्यासपीठ ठरणार आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये शिक्षण परिसंस्थेतील प्रमुख घटक, नवोपक्रम, संधी, तयारी आणि स्केलेबिलिटी मॅपिंगवर विशेष भर देण्यात येणार आहे.

नवीन शिक्षण धोरण 2020 अंतर्गत भारताच्या शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्यात आल्या असून, त्यांची अंमलबजावणी पुढील टप्प्यात अधिक वेगाने होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह 2026 धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणणार आहे. जबाबदार, समावेशक आणि मोठ्या प्रमाणावर एआय-आधारित शिक्षणाला चालना देणे हे या कॉन्क्लेव्हचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या कॉन्क्लेव्हची तयारी पूर्ण केली असून, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे दोन दिवसीय भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह 2026 आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम भारत सरकारतर्फे १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर, पूर्वतयारीचा भाग म्हणून होणार आहे.

या कॉन्क्लेव्हमध्ये शिक्षणासाठी एआय एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यासंबंधी चर्चा, सत्रे आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, भारताच्या शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरासाठी दिशा निश्चित केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here