सोनम वांगचुक यांची सुटका अशक्य

0
58
सोनम वांगचुक यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत स्थानबद्धता रद्द
सोनम वांगचुक यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत स्थानबद्धता रद्द

सोनम वांगचुक यांची सुटका अशक्य

नवी दिल्ली

लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुटकेबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका सुप्रीम कोर्टात स्पष्ट केली आहे. वांगचुक यांची तब्येत उत्तम असून केवळ प्रकृतीचे कारण देऊन त्यांची सुटका करणे शक्य नाही असे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी त्यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली असून त्यावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली.

सोमवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने वांगचुक यांचे वाढते वय आणि आरोग्य लक्षात घेता त्यांच्या अटकेबाबत फेरविचार करावा, असा सल्ला सरकारला दिला होता. मात्र, सरकारने त्यावर विचार करून आज स्पष्ट केले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची सुटका करणे सध्या शक्य नाही. वांगचुक सध्या जोधपूर मध्यवर्ती कारागृहात असून त्यांना एम्स जोधपूरच्या डॉक्टरांकडून सर्वोत्तम उपचार मिळत असल्याचा दावाही केंद्राने केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here